ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आचरा विभाग शिवसैनिकांनी साजरा केला आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस...!

आचरा विभाग शिवसैनिकांनी साजरा केला आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस...!

प्रकाशन: 26 Mar 2022 09:46 PM
वाचन संख्या 194

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आघाडीचे शिवसेना नेते व कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा विभाग शिवसैनिकांनी आमदार नाईक यांची भेट घेत त्यांचा वाढदिवस साजरा केला.

कणकवली शहरातील ‘विजयभवन’ येथे सायंकाळी हा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आचरा विभाग संघटक आणि ग्रामीण स्तरावरील क्रियाशील शिवसेना लोकप्रतिनिधी आणि पळसंब ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी आमदार वैभव नाईक यांना केक भरवून समस्त आचरा विभाग शिवसैनिक,पदाधिकारी यांच्यातर्फे हा विशेष दिवस साजरा केला.

याप्रसंगी पळसंब सरपंच व आचरा विभाग संघटक श्री चंद्रकांत गोलतकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या सामान्य कार्यकर्त्यांना मदत करायच्या गुणाची आणि समाजकार्य करण्यासाठी सतत प्रोत्साहीत करण्याच्या वृत्तीची प्रशंसा करुन आभार मानले. प्रत्येक शिवसैनिकाला स्वतःची ओळख निर्माण करुन देण्याचे काम आमदार वैभवजी नाईक नेहमीच करत आलेत असेही पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केले .

सतत संपर्कात रहाणारे आपले आमदार नेहमीच सुदृढ आणि सक्षम राहतील अशा सदिच्छा यावेळी आचरा विभाग शिवसैनिकांनी व पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी आमदार वैभव नाईक यांना दिल्या.

यावेळी आचरा विभाग संघटक श्री.चंद्रकांत गोलतकर यांच्यासमवेत जेष्ठ शिवसैनिक श्री.श्यामजी घाडी, मच्छिमार नेते श्री .नारायण कुबल , श्री .विनायक परब , श्री . रूपेश घाडी , आचरा तलाठी श्री .काळे , श्री .सदानंद घाडी , श्री .रसिक कुर्हाडे , श्री . राजू मेस्त्री व आचरा विभागीय शिवसैनिक उत्साहाने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स