दशावतारी कलाकारांना मिळाली मदत
कुडाळ मध्ये आज झाले वाटप
कुडाळ | प्रतिनिधी : अखिल दशावतारी पारंपरिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ आणि टेंडर रूट संस्था महाराष्ट्राच्या वतीने आज दि. १७ ऑगस्ट कुडाळ येथे ५० हजार रुपयांची कलाकारांना मदत दिली गेली आहे. प्रत्येकी एक हजार प्रमाणे ५० कलाकारांना धान्य वाटप केले आहे.
खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, गटविकास अधिकारी विजय चव्हाण,सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव,जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, संजय पडते, अतुल बंगे,विकास कुडाळकर यांच्या उपस्थितीत कुडाळ पंचायत समिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)