मालवणमधील आरोग्य यंत्रणा झालीय अलर्ट
मालवण | वैभव माणगांवकर :- तालुक्यात कोरोनाचे संकट कमी होत असल्याने मालवणात डेंगी आणि शहरात मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण आढळून आलेल्या भागात प्रभावी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.गेल्या काही दिवसात ज्या व्यक्ती परजिल्ह्यातून आले आहेत त्यांनी ग्रामीण रुग्णालयात जात तपासणी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी केले आहे.
मालवण तालुक्यात कुंभारमाठ येथील डेंगीचा एक तर वायरी गांवकरवाडा व बांगीवाडा येथील प्रत्येक एक असे दोन मलेरियाचे रुग्ण सापडून आले आहेत. आरोग्य विभागास याची माहिती मिळताच रुग्ण आढळून आलेल्या भागाचा सर्वे करून डास प्रतिबंधात्मक फवारणी तसेच अन्य आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी महिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)