माजी सभापती श्री.मधुकर सावंत यांना आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार प्रदान.
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : शिवजयंती उत्सव मंडळ,हळवल यांच्या वतीने गेली १३ वर्षे कै.दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण यांच्या स्मरणार्थ आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार देऊन तालुक्यातील एका व्यक्तीचा सन्मान केला जातो.
यावर्षी हा पुरस्कार कणकवलीचे माजी सभापती मा. मधुकर सावंत यांना मंडळाच्या वतीने शिवजयंती औचित्य साधून युवासेना माजी जिल्हाप्रमुख ऍड हर्षद गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हळवल शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने गेली ३३ वर्षे मोठ्या उत्साहात तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते
यावर्षीही यानिमित्ताने सत्यनारायणाची महापूजा, हरिपाठ, संयुक्त दशावतार असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपतालुकाप्रमुख श्री राजु राणे, भास्कर राणे, गणेश राणे, विजय परब,मा.उपसरपंच प्रदीप गावडे,अरुण राणे, अप्पा ठाकूर, मा.सरपंच सौ स्मिता परब,शर्वरी राणे,युवासेना विभागप्रमुख रोहित राणे,बाबू महाडेश्वर, सौ राखी राणे,संदीप गुरव,विकास गुरव,सुभाष परब,सुभाष राणे,ऍड शंकर राणे,सदा सावंत,उमेश परब उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन.
'आम्ही ज्या दिवशी राजकारणात येऊ त्या दिवशीपासून भले भले गायब होतील...!'