मसुरे डागमोडेत रंगणार निमंत्रित महिलांचा कबड्डी सामना...!
भवानीमातेच्या वार्षिक गोंधळ विधीनिमित्त जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी सामन्यांचे आयोजन.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे डागमोडे मंदिर येथील भवानीमातेच्या वार्षिक गोंधळ विधीनिमित्त शुक्रवार दिनांक २५ मार्च रोजी जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी निमंत्रित महिला कबड्डी सामने ही होणार आहेत. सदर कबड्डी स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आणि मालवण कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने तसेच नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि ग्रामस्थ यांच्या वतीने स्पर्धा संपन्न होणार आहेत.
सदर कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये दहा हजार, द्वितीय रोख रू.पाच हजार, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी रोख रुपये दोन हजार आणि एक ते चार क्रमांकांना कैलास वासी शिवाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्री संदेश ठाकूर आणि छोटू ठाकूर पुरस्कृत भव्य आकर्षक कायमस्वरूपी चषक. तसेच उत्कृष्ट चढाई, क्षेत्ररक्षक, अष्टपैलू खेळाडू यांना रोख रुपयांची बक्षीसे आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धा संध्याकाळी ठीक पाच वाजता सुरू होणार आहे. स्पर्धेमधील सर्व खेळाडूंची मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धा निःशुल्क आहे.अधिक माहितीसाठी नाव नोंदणी नितीन हडकर मो न ९४०३०९७२४९, दत्तप्रसाद पेडणेकर मो.९४२११४५८२७ येथे संपर्क साधावा. यावेळी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सिने अभिनेत्री प्राजक्ता वाडये आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध मान्यवरांचे सत्कार संपन्न होणार आहेत. सर्व क्रीडा रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डागमोडे आणि डागमोडे ग्रामस्थ यांनी केले आहे..
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)