ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव यांचे काम आदर्शवत - दीपक गुरव

हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव यांचे काम आदर्शवत - दीपक गुरव

प्रकाशन: 17 Aug 2021 12:58 PM
वाचन संख्या 220

हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव यांचा निवृत्तीपर सत्कार

कणकवली / उमेश परब : हळवल गावचे पोलिस पाटील प्रकाश गुरव यांचे काम नेहमीच आदर्शवत राहिले आहे. पोलिस पाटील म्हणून कार्यरत असताना सर्वाना समान न्याय देण्याचे काम गुरव यांनी केले आहे. हळवल गावाला २०१० / २०११ साली तंटामुक्त गाव हा पुरस्कार मिळाला त्यात पोलिस पाटील प्रकाश गुरव यांचा मोलाचा वाटा होता. गावातील तंटे सलोख्याने सोडविण्याचे काम गुरव यांनी केले आहे. कोरोनाच्या काळातही जीवाची पर्वा न करता गुरव यांनी गावात सुयोग्य असे काम केले. त्याचे हे काम नेहमीच आदर्शवत राहील असे गौरवोद्गार हळवल सरपंच दीपक गुरव यांनी काढले.
हळवल गावचे पोलीस पाटील प्रकाश गुरव हे सेवा निवृत्त झाले त्याबद्धल हळवल गावच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच अरुण राऊळ, ग्रा. प सदस्य सुजाता परब, प्रकाश घोगळे, उत्तम जाधव, ग्रामसेवक सुरेश केदार माजी सभापती मधुकर सावंत, जयसिंग राणे, गणेश राणे, मारुती सावंत, भास्कर राणे, बबन सावंत, धाकू तांबे आदींसह हळवल ग्रामस्थ उपस्थित होते.
आपण केलेल्या सामाजिक कार्यात हळवल वासीयांचे खूप मोठे सहकार्य लाभले आपला गाव नेहमीच तंटामुक्त राहावा यासाठी आपण प्रयत्न केले आणि त्यात यशस्वी झालो. मी आज माझ्या पोलीस पाटील या पदावरून निवृत्त झालो असलो तरी हळवल गावासाठी नेहमी आपण कार्यरत राहू असे प्रतिपादन निवृत्त पोलीस पाटील प्रकाश गुरव यांनी यावेळी बोलताना केले. हळवल पोलिस पाटील प्रकाश गुरव हे निवृत्त झाल्यानंतर सदर पद हे रिक्त झाले सध्यस्थितीत हळवल गावासाठी कासरल गावचे पोलीस पाटील उदय सावंत यांच्या जवळ अतिरिक्त पदभार असून हळवल गावात लवकरात लवकर नवीन पोलीस पाटील नियुक्त करावेत अशी मागणी हळवल ग्रामस्थांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स