ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
तारकर्ली रस्त्यावर आमरण उपोषण
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तारकर्ली रस्त्यावर आमरण उपोषण

प्रकाशन: 17 Aug 2021 03:00 PM
वाचन संख्या 51

देवी केळबाई देऊळ ते देवबाग रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आंदोलन.

समाजकार्यकर्ते सुरेश बापार्डेकर यांचे नेतृत्व.

मालवण | वैभव माणगांवकर : मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील ग्रामस्थांनी संपूर्ण खड्डेमय रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आमरण उपोषणाचे आंदोलन छेडले आहे. तारकर्ली येथील हाॅटेल गजानन नजिकच्या रस्त्यावर येथील ग्रामस्थांनी सुरेश बापार्डेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली.
वारंवार निवेदने देऊनही ,पर्यटनदृष्ट्या महसूल देणार्या या रस्त्याचे http://localhost/news/public/uploads/2006 सालानंतर देवी केळबाई देऊळ ते देवबाग इथपर्यंतचे सलग डांबरीकरणच झालेले नाही म्हणून आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागत असल्याचे सुरेश बापार्डेकर यांनी स्पष्ट केले.
आमदार, खासदार आणि स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतरही ही समस्या सुटत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली . स्थानिक लोकांच्या वाहनांच्या डागडुजी वगैरे यासाठीही प्रचंड प्रमाणात खर्च होऊन नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे असे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
गेल्यावर्षीही याच प्रकारचे निवेदन व उपोषण केले होते त्यावेळी आश्वासन मिळाल्याने ते आंदोलन थांबविण्यात आले होते परंतु आता त्या आश्वासनाची पूर्तता होताना दिसत नसल्याने नाईलाजाने या आमरण उपोषणाची पाळी आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
ठोस अशी कारवाई करुन गणेश चतुर्थीपूर्वी कामाची व काँक्रिटीकरणाची हमी न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल असे स्थानिकांनी सांगितले.
श्री बापार्डेकर यांच्यासोबत वैभव सावंत ,महेंद्र चव्हाण आणि इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स