श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठान मुणगेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत!
मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठान मुणगे व मुंबई यांच्या वतीने चिपळूण मधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुणगे, देवगड ग्रामस्थ, मुंबईकर, मित्र परिवार व सहकाऱ्यांच्या वतीने मदतनिधी उभारण्यात आला. या निधीतून जीवनावश्यक अश्या वस्तूंचे किट तयार करून ज्ञानप्रबोधिनी चे सदस्य श्री मिलिंद लिंगायत व त्यांच्या सहकारी व मुणगे गावचे ग्रामस्थ श्री सतीश मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम गावात प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्वतः जाऊन मदतकार्य केले.यावेळी बहादूर वाडी, बहादूर शेख नाका,कळंबस्ते हायस्कुल जवळखेर्डी,माळेवाडी, बाजारपेठ, परीट आळी या भागात मदत देण्यात आली.
या सामाजिक कार्यासाठी मुणगे गावच्या सरपंच श्री साक्षी गुरव, मुणगे हायस्कूल चे व्यवस्थापक श्री देवदत्त पुजारे, मुणगे हायस्कुल माजी विद्यार्थी संघटनेचे सचीव श्री विजय बोरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभलयाची माहिती देण्यात आली. श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठानच्या वतीने समाजकार्यात वस्तू स्वरूपात व अर्थिक दृष्ट्या सहभाग घेतला अश्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)