बिबट्यासदृश्य क्रूर प्राण्यामुळे कुवळे -रेंबवलीतील मेंढपाळ चिंताग्रस्त..!
शेतकऱ्यांनी दिले सरपंचांना दिले निवेदन…!
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील कुवळे, रेंबवली सडेवाडी येथील शेतकरी रहिवासी धनगर समाज हा शेतकरी पुरक जोड व्यवसाय म्हणून शेळी मेंडी पालन करतात.त्यावरच त्यांची उपजीविका चालते .पण अलीकडे त्यांना नविन संकट उभे राहिले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जंगलात शेतकरी शेळ्या मेंढ्या राखन करत असताना बिबट्या सदृश हिंस्र प्राणी हल्ला करून शेळ्या भक्षण करत आहे. अत्यंत क्रूर असणारा हा प्राणी मणुष्याला अजिबात घाबरत नाही. अशी माहिती प्रत्यक्ष दर्शनी ग्रामस्थ सांगत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून हा प्राणी या परिसरात वास्तव्य करून आहे.चार पाच शेळ्या फस्त केल्या तसेच गाई गुराना जखमी केल्या ची घटना घडली आहे.याबाबत सरपंच कुवळे, रेंबवली, साळशी, यांना निवेदन दिले असून भविष्यात या प्रणयाच्या हल्ल्या पासून माणसांना देखील धोका संभवत असल्याची भिती व्यक्त केली जात असून वनविभागाकडून याचा बंदोबस्त करण्याची या निवेदनात मागणी केली आहे.
छायाचित्र : गुगल संग्रहीत
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)