ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
महिलांनी संघटित राहून यश मिळवावे : माधव गांवकर.

महिलांनी संघटित राहून यश मिळवावे : माधव गांवकर.

प्रकाशन: 17 Mar 2022 02:07 PM
वाचन संख्या 147

मसुरे देऊळवाडा येथे महिला मेळाव्याचे आयोजन.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे देऊळवाडा वेताळ मंदिर नजीक महिलांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव गांवकर म्हणाले, मी या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाने भारावून गेलो आहे. महिलांनी संघटित होऊन असेच कार्य करण्याची गरज असल्याचे सांगत येथील आघाडीच्या महिला सौ.वर्षाराणी अभ्यंकर यांचे नियोजन संयोजन एकूण कार्यक्रमाची विविधता पाहता नियोजनाला तोड नसल्याचे सांगत प्रशंसा केली.


यावेळी व्यासपीठावर देऊळवाडा सरपंच आदिती मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र सावंत,डॉ विणा मेहेंदळे, बीळवस सरपंच सौ मानसी पालव, प्रमुख वक्त्या अर्चना कोदे, युवा प्रतिष्ठानचे अमोल गुराम, नेत्रतज्ञ डॉ. कदम, निलेश लाड, ग्रा. पं. स.अशोक मसुरकर, चंद्रकांत राणे,सौ.मनीषा बागवे, सौ.माधवी बागवे, सौ.ममता राणे, सौ.साधना चौगुले, मीनल तांबे, जयमाला भोगले, स्वाती कोपरकर, रंजना बागवे, प्रसन्ना मेस्त्री, अश्विनी परब, नम्रता बागवे, समिक्षा बागवे, प्रगती परब, सानिका आमडोसकर, सिमरन बागवे, समीक्षा परब, गितेश्री मसुरकर, उल्का वझे, विणा अभ्यंकर, संदीप कबरे, आदी मान्यवर,महिला ग्रामस्थ उपस्थित होते.


यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गीत गायन, पाककला, रांगोळी,लांबकेस, वेशभूषा, होम मिनिस्टर आदी स्पर्धा परीक्षक श्री सचिन डोळस, श्री गुरुनाथ ताम्हणकर, सौ.अर्चना कोदे, सौ.स्वाती कोपरकर, श्री माधव गांवकर यांच्या परिक्षणाखाली पार पडली.
मोठा गट रांगोळी: प्रथम सुप्रिया चव्हाण, द्वितीय दिपीका लाकम,
लहान गट: प्रथम विद्या लाकम, द्वितीय रोशनी सावंत, तृतीय स्वराली बागवे व तन्वी लाड.
पाककला: प्रथम रंजना बागवे, द्वितीय विणा अभ्यंकर, तृतीय रचना मेस्त्री, गितगायान: प्रथम दिशा लाड, द्वितीय सिमरन बागवे, तृतीय शीतल बागवे. वेशभूषा: प्रथम शीतल बागवे,द्वितीय नम्रता बागवे, तृतीय राजश्री घाडीगांवकर.

लांबकेस मोठा गट: प्रथम नम्रता बागवे, द्वितीय लक्ष्मी परब, तृतीय प्रतीक्षा परब. लहान गट: प्रथम सहना वझे व ज्योती सावंत, द्वितीय समीक्षा बागवे, तृतीय तन्वी लाड, मयुरी सावंत.

होम मिनिस्टर: प्रथम शर्वरी परब, द्वितीय प्रज्ञा बागवे. विजेते व उत्तेजनार्थ बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. वर्षाराणी अभ्यंकर यांनी केले यावेळी अभ्यंकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिला सबलीकरण आणि एकोपा यांचे महत्त्व पटवुन देत यापुढेही असेच महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन असे सांगितले. तर सूत्रसंचालन विद्या लाकम,आभार कु. सहना यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स