ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
समिक्षा परब ठरल्या पैठणीच्या मानकरी ; बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे महिलांसाठी आयोजीत कार्यक्रम.

समिक्षा परब ठरल्या पैठणीच्या मानकरी ; बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे महिलांसाठी आयोजीत कार्यक्रम.

प्रकाशन: 17 Mar 2022 01:33 PM
वाचन संख्या 89

झटपट नाष्टा पाककला स्पर्धेत स्वाती पोखरणकर, सानिका गावडे ठरल्या विजेत्या.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
“झटपट नाष्टा” या पाककला स्पर्धेत
२० महिलांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक
स्वाती पोखरणकर,
सानिका गावडे.
द्वितीय क्रमांक
गीतांजली शेटये,रुपाली माळवदे,रश्मी फोपळे.
तृतीय क्रमांक-
नमीता नांदोसकर,
योगीता चव्हाण,
शिवानी गाड.
उत्तेजनार्थ – सायली माळवदे,प्रज्ञा देऊलकर.


या स्पर्धेचे परीक्षण प्रियांका भोगटे यांनी केले. या स्पर्धेनंतर नृत्याचा व गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती नृत्यामध्ये दाखवण्यात आली.
निलम कदम, मंगल माळवदे, प्रिया नांदोस्कर, सायली नांदोसकर, प्राची गावडे, सायली गावडे,सायली गावडे, सायली माळवदे, रश्मी फोपळे, सानिका गावडे, नेहा कदम, रिया कदम समीक्षा हिर्लेकर
यानी नृत्य सादर केली.
यानंतर खेळ रंगला पैठणीचा स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत ३० महिलांनी सहभाग घेतला.
त्यातील प्रथम ३ विजेते
समिक्षा परब,सानिका गावडे,सायली बोडये.
यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुण्या मिथीला नागवेकर यानी महिलाना मार्गदर्शन केले. अनघा हडकर यानी इतिहासातील प्रसिद्ध महिला व आजच्या महिला या विषयी माहिती सांगितली .

या स्पर्धा सामाजिक कार्यकर्त्या सौ मिथीला नागवेकर व सौ गीता नाईक यानी पुरस्कृत केल्या.
या कार्यक्रमाचे नियोजन वैष्णवी लाड तर सुजाता पावसकर यांनी केले.सौ.अर्चना धुत्रे यांनी स्पर्धेचे मुल्यांकन केले.

या कार्यक्रमाला मिथीला नागवेकर, गीता नाईक, अर्चना धुत्रे, वैष्णवी लाड, मनिषा पारकर, रूही प्रभुलकर, झोरे मॅडम, सुजाता पावसकर, प्रियांका भोगटे, भाग्यश्री पडते नम्रता पावसकर व कट्टा परिसरातील महिला उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स