ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
स्वतंत्र कोकणचे प्रणेते प्रा.महेंद्र नाटेकर यांचे निधन…

स्वतंत्र कोकणचे प्रणेते प्रा.महेंद्र नाटेकर यांचे निधन…

प्रकाशन: 16 Mar 2022 07:50 PM
वाचन संख्या 57

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : स्वतंत्र कोकण संघटनेचे प्रणेते तसेच सोनवडे घाटमार्गासाठी गेली चाळीस वर्षे लढा देणारे प्रा.महेंद्र नाटेकर यांचे आज अल्‍पशा आजाराने निधन झाले. गोवा बांबुळी येथे त्‍यांच्यावर उपचार सुरू होते.

प्राध्यापक महेंद्र नाटेकर यांनी गेली वीस वर्षे पेन्शनर संघटनेसाठीही धडाडीने कार्य केले होते. सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांतही त्‍यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. त्‍यांच्या निधनाबद्दल सर्वत्र क्षेत्रातून हळहळ व्यक्‍त होत आहे.

प्रा.नाटेकर यांनी शिक्षण पूर्ण झाल्‍यांनतर मुंबई, पुणे येथे आलेल्‍या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या डावलून जांभवडे (ता.कुडाळ) येथील दुर्गम गावामध्ये कनिष्‍ठ महाविद्यालयात अध्यापन सुरू केले होते. त्‍यानंतर त्‍याच कॉलेजमध्ये ते प्राचार्य पदावरून निवृत्त झाले. या कालावधीत विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी परवड पाहून त्‍यांनी चाळीस वषापूर्वी सोनवडे घाटमार्गासाठी लढा सुरू केला होता. स्थानिक ग्रामस्थांना एकत्र आणून त्‍यांनी तत्‍कालीन मु्ख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या काळात सोनवडे घाटमार्गाला मंजूरीही मिळवून आणली.

सिंधुदुर्ग जिल्‍हा परिषदेमध्येही ते निवडून आले होते. मात्र त्‍यांनतर राजकारणात न जाता त्‍यांनी कोकणातील तरूणांना इथेच नोकऱ्या मिळाव्यात. गोव्याप्रमाणे कोकणचीही सर्वांगिण प्रगती व्हावी यासाठी स्वतंत्र कोकण राज्‍य निर्मितीचा ध्यास घेतला होता. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत त्‍यांनी झंझावाती दौरेही केले होते. अनेक नाटकेही त्‍यांनी लिहिली. स्वतंत्र कोकण, सोनवडे घाटमार्गसह पेन्शनरला न्याय मिळावा यासाठीही ते सतत झटत राहिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स