ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चाकरमान्यांच्या गैरसोयीला परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार : राजन तेली.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चाकरमान्यांच्या गैरसोयीला परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार : राजन तेली.

प्रकाशन: 16 Mar 2022 01:06 PM
वाचन संख्या 47

जिल्हा नियोजनचा निधी फक्त ५० टक्केच झाला खर्च;भाजपा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडणार ..

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): होळी सण येत आहे,कोकणात होळी सणाला येणाऱ्या चाकरमान्यांची अडचण झाली आहे.एसटी कामगारांचा संप आहे,त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील मोठा फटका बसला आहे.त्याला परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार आहेत,असा घणाघाती आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.या विरोधात मंगळवार न्याय न मिळाल्यास भाजपा विधिमंडळात आवाज उठवणार आहे.जिल्हा नियोजनचा ८८ कोटींचा निधी खर्च झाला असून फक्त ५० टक्केच खर्च झाला आहे.भाजपा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडणार इशारा श्री. तेली यांनी दिला.

भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यालय कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अनिल परब मंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील एसटी बसस्थानक व अन्य कामे होतील.कोकणी जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.आता होळीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांना वारेमाप पैसे द्यावे लागताहेत.खासगी बसेस धारक लूट करत आहेत.कॉलेज चालू झाली आहेत,मुलांच्या परीक्षा आहेत,होळी सण असताना एसटी सेवा बंद आहे.संपकरी लोकांना थांबवण्यासाठी शासनाला कुठलेही यश आले नाही.उत्तर प्रदेश मध्ये परिवहन सेवा फायदेशीर ठरत आहे.मग आपल्या राज्यात लिकेज कुठे आहे? गोंधळ कुठे आहे?याची चौकशी करावी.उत्तर प्रदेश प्रमाणे राज्यात एसटी फायद्यात आली पाहिजे,अशी मागणी राजन तेली यांनी केली.

कोरोना पूर्वी एसटी बसस्थानके नुतनीकरण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात निधी देण्यात आला होता.ती कामे ठप्प या सरकारने केली आहे.जिल्ह्यातील बसस्थानकांची अवस्था बिकट आहे.कणकवली, मालवण,सावंतवाडी या बसस्थानकांची अवस्था वाईट आहे,असा टोला राजन तेली यांनी केला.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन १७० कोटी आले, त्यापैकी केवळ ८८ कोटी खर्च झाला आहे.पालकमंत्री उदय सामंत यांचा अंकुश नसल्याने ही परिस्थिती आहे.स्थानिक विकास कार्यक्रमान अद्याप मंजुर नाही.आता मार्च आला,मंजुरी केव्हा मिळणार?जिल्ह्यातील ढिसाळ कारभार यावरून दिसून येत आहे.मार्च अखेर पर्यत हा निधी खर्च न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात आंदोलने भाजपा करणार आहोत. पुढील काळात आम्ही तिव्र आंदोलन करणार आहोत.कुंभवडे व अन्य छोटी धरणे झालीत पण शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.जलसंधारण विभागाच्या विरोधात आंदोलन करणार आहोत.ज्या ठिकाणी भूसंपादन न करता काम चालू केली ,त्या विरोधात आंदोलन आम्ही करणार इशारा राजन तेली यांनी दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स