आचिर्णे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी श्री. जयसिंग रावराणे तर व्हाईस चेअरमन पदी श्री. उत्तम सुतार बिनविरोध..!
वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित आचिर्णे पंचवार्षिक निवडणूकमध्ये भाजपा पुरस्कृत श्री देवी रासाई विकास आघाडी, आचिर्णे पँनल मधील 13 पैकी 13 उमेदवार निवडून आणुन भाजपची निर्विवाद सरशी झाली होती.
त्यानंतर 15 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 रोजी या सोसायटी च्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदांची निवड करण्यात आली. या निवडीमध्ये गावचे माजी सरपंच श्री. जयसिंग हनुमंत रावराणे यांची चेअरमन पदी तर श्री. उत्तम गणपत सुतार यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यांच्या निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. या वेळी गावचे सरपंच रुपेश रावराणे, माजी उप सरपंच सुशील रावराणे, सर्व सोसायटी संचालक ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)