ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरेत कोरोना योद्धा, गुणवंतांचा गुणगौरव!

मसुरेत कोरोना योद्धा, गुणवंतांचा गुणगौरव!

प्रकाशन: 17 Aug 2021 11:25 AM
वाचन संख्या 116

मर्डे ग्रामपंचायतचा उपक्रम

मसुरे | झुंजार पेडणेकर : मर्डे ग्रामपंचायतच्या वतीने शैक्षणिक, पत्रकार, पोलीस तसेच आरोग्य क्षेत्रातील काम करण्याऱ्यांचा कोरोना योद्धा, व गुणवंत विध्यार्थी यांचा गुणगौरव समारंभ स्वातंत्र्य दिनी करण्यात आला.
मसुरे गाव हा गुणवंतांची खाण आहे. गुणवंतांचे कौतुक होत असताना यशामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. कोरोना महामारीत मसुरे गावातील आरोग्य कर्मचारी, वैधकीय अधिकारी, शिक्षक यांनी बजावलेली कामगिरी उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन माजी जी. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी यावेळी केले. सरपंच संदीप हडकर यांनी प्रास्ताविकात गुणवंतांचे कौतुक करताना पुढील काळात सुद्धा कोरोना बाबत सर्वांनी आपली कामगिरी जबाबदारीने पार पाडावी असे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, डॉ. वीणा मेहेंदळे, संन्मेष मसुरेकर, केंद्रप्रमुख नारायण देशमुख यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शुभारंभ सरपंच संदीप हडकर यांच्या हस्ते दीप प्रजवलन करून झाला.
यावेळी माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, रा काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ विश्वास साठे, प स सदस्या सौ गायत्री ठाकूर, उपसरपंच राजेश गावकर, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर, ग्राम सदस्य जगदीश चव्हाण,पपु मुळीक, सचिन पाटकर, रमाकांत सावंत, रिया आंगणे, पूजा ठाकूर, सारिका मुणगेकर, डॉ अनिरुद्ध मेहेंदळे, डॉ सौ. वीणा मेहेंदळे,डॉ अनिता गिरकर, डॉ.नासिर पटवेकर, पथ्यालॉजिस्ट संन्मेष मसुरेकर, पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, संतोष अपराज, झुंजार पेडणेकर, मसुरे पोलीस हरिश्चंद्र जायभाय,प्रा. आरोग्य केंद्राचे व्ही सी पारकर, सौ. पल्लवी नाचणकर, आरोग्य सेवक सिद्धेश धुरी, पोलीस पाटील सोमा ठाकूर, नेवेश फर्नांडिस, सोनल भोगले, शिक्षक उमेश खराबी, विमल चव्हाण, भक्ती भोगले, गुरुनाथ ताम्हणकर, मुख्या. सौ शर्वरी सावंत, पो पाटील सोमा ठाकूर, नेवेश फर्नांडिस,वीज वितरणचे विनोद परब, अमित बागवे, रुपेश सावंत, प्रफ्फुल परब, ग्रामपंचायत कर्मचारी महेश खोत, विनोद मोरे, सुदर्शन मसुरकर, शैलेश मसुरकर, कमलेश ठाकूर आदींसह अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस उपस्थित होते.सुत्रसंचलन पंढरीनाथ मसुरकर, तर आभार उपसरपंच राजेश गावकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 303

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स