ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चाफेडच्या उपशिक्षिका सौ.रश्मी आंगणे कै.जी.टी.गांवकर सेवामयी शिक्षक पुरस्काराचा मानकरी.

चाफेडच्या उपशिक्षिका सौ.रश्मी आंगणे कै.जी.टी.गांवकर सेवामयी शिक्षक पुरस्काराचा मानकरी.

प्रकाशन: 11 Mar 2022 03:27 PM
वाचन संख्या 158

चाफेड शाळेत होणार अ.भा.सानेगुरुजी कथामाला शिक्षणतज्ञ कै.जी.टी.गांवकर सेवामयी शिक्षक पुरस्काराचे वितरण.

चिंदर | विवेक परब : अखिलभारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा शिक्षण तज्ज्ञ कै. जी.टी.गांवकर सेवाभावी शिक्षक पुरस्कार २०२२ हा देवगड तालुक्यातील चाफेड जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका सौ. रश्मी रामचंद्र आंगणे यांना जाहिर,झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद शाळा चाफेड येथे २७ मार्चला सकाळी देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. प्रजापती थोरात यांच्या शुभहस्ते तसेच श्री. मोहन गांवकर-माजी उपाध्यक्ष –कोकण मित्रमंडळ कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान होणार आहे.

या सोहळ्यास चाफेड सरपंच संचिता भोगले, शिरगांव प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी विनायक पाटिल, साळशी केंद्र प्रमुख वर्षा लाड, शाळा व्यवस्थापन समिती चाफेड भोगलेवाडी अध्यक्ष–प्रफुल्ल परब, गायगोठण गणपती मंदिर देवस्थान समिती अध्यक्ष पंढरी कांडर हे उपस्थित राहाणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सेवाभावी शिक्षक पुरस्कार निवड समिती अध्यक्ष सदानंद म. कांबळी व साने गुरुजी कथामाला अध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स