ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वागदेतील उद्योजकाचे 'लास्ट लोकेशन' फोंडाघाट खिंडितच..!

वागदेतील उद्योजकाचे 'लास्ट लोकेशन' फोंडाघाट खिंडितच..!

प्रकाशन: 11 Mar 2022 03:09 PM
वाचन संख्या 232

जळालेल्या अर्टिगा कारचा पोलिस तपास सुरु..!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) :फोंडाघाटात खिंडी नजीक अर्टिगा कारला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती.
ही कार आरटीओ दप्तरी निलेश विवेकानंद काणेकर यांच्या नावे नोंद असल्याचे स्पष्ट झाले होते.


पोलीस व वागदे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत एक इसमाचा सांगाडा गाडीत आढळून आला होता. कारमधील जळालेली व्यक्ती ही उद्योजक निलेश काणेकर असावी,असा प्राथमिक अंदाज बांधून नातेवाईकांनी रात्री उशिरा अत्यसंस्कार केले तसेच पोलिसांच्या तपासात निलेश काणेकर यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन कार जळालेल्या ठिकाणी असल्याचे निष्पन्न होत आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेत शासकीय रुग्णालयात नेत डीएनए साठी नमुने घेण्यात आले आहेत. त्याची तपासणी करण्यासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात येणार आहेत.कारचा स्फोट झाला,असा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे.त्यानुसार कार जळाली त्या ठिकाणी कार मध्ये स्फोट कसा झाला? याची तपासणी कार मेकॅनिक ला घेऊन कणकवली पोलिस करणार आहेत. त्यामुळे कारने पेट कोणत्या कारणातून घेतला याचे कारण पुढे येणार आहे.

याप्रकरणी घटनेची फिर्याद सुयोग शरद गावडे रा.वागदे यांनी मालक निलेश काणेकर यांची अर्टीगा कार शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी जळून त्यात ड्रायव्हर सीटवर एक जळक्या स्थितीत मयत दिसून येत आहे,असे म्हटले आहे.

घटनास्थळी कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर,उपनिरीक्षक श्री.देठे, मंगेश बावधने व पोलिसांच्या पथकाने पंचनामा केला.जाब जबाब नोंदवण्यात आला,तसेच नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला आहे,त्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी वागदे गावातील व कणकवली येथील व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स