रोणापाल माऊली वर्धापनदिन १३ मार्च रोजी.
बांदा | राकेश परब : रोणापाल ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापनदिन रविवार १३ मार्च रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी देवीची पूजाअर्चा व अभिषेक, दुपारी २ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी महाआरती, दर्शन सोहळा, तीर्थप्रसाद होईल.
सायंकाळी स्थानिकांची भजने व रात्री जय हनुमान दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समिती व रोणापाल ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)