ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सौ.ममता गुरव ठरल्या होममिनिस्टरच्या विजेत्या..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सौ.ममता गुरव ठरल्या होममिनिस्टरच्या विजेत्या..!

प्रकाशन: 10 Mar 2022 12:22 PM
वाचन संख्या 85

आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे आयोजित होममिनिस्टर स्पर्धा..

चिंदर | विवेक परब : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या होममिनिस्टर स्पर्धेत ३२ स्पर्धकांमधून बाजी मारत साईसमर्थ कलेक्शन पुरस्कृत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या सौ ममता गुरव तर उपविजेत्या सौ स्वरा राठवड यांना सीकॅफे पुरस्कृत सोन्याची नथ देवून गौरविण्यात आले.

स्पर्धेचे बक्षिस वितरण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी, सरपंच प्रणया टेमकर,वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, अशोक कांबळी, दिपाली कावले, भिकाजी कदम,उंडील तलाठी सौ सुनिता मेस्त्री, ग्रथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समितीच्या सौ भावना मुणगेकर,कामिनी ढेकणे तसेच सौ वैशाली सांबारी, संतोष गोसावी, सौ गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

एकूण सहा फेर्यांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक फेरी साठी आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली होती.
सदर बक्षिसे सौ उर्मिला सांबारी, रचना जोशी, सीमा घुटूकडे, वैशाली सांबारी, स्मिता परब,सुमित्रा गुरव,श्रीमती शोभा सुखटणकर, यशोधन गवस,कुलसुम नर्सरी चे सौरभ राणे,श्रीमती घाडी,यांनी प्रायोजित केली होती. उपविजेत्या होममिनिस्टर ला सिकॅफे आचरा च्या प्रणया टेमकरयांच्या कडून सोन्याची नथ तर विजेत्याला साईसमर्थ कलेक्शनच्या भावना मुणगेकर यांच्या कडून सेमी पैठणी देण्यात आली.

या स्पर्धेला उपस्थित स्पर्धकांसाठीही प्रश्न मंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अचूक उत्तरे देणारया प्रेक्षकांना मानसी राणे, गीता खेडेकर यांच्या कडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. अशेष पेडणेकर आणि सौ मृणालिनी आचरेकर यांच्या कडून उपस्थितांसाठी अल्पोपहारही देण्यात येणार आला.स्पर्धा यशस्वीतेसाठी वाचनालयाचे महेश बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण, समृद्धी मेस्त्री, विलास आचरेकर, रुपेश साटम यांनी विशेष परीश्रम घेतले.

कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेत सूत्रसंचालनही विनिता कांबळी यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स