ओसरगांव शाळेतील महिला दिन कार्यक्रमाला सिने अभिनेत्री अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती..!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नं 1 ओसरगांव येथे , 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त “चला सुसंवाद घडू या ” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते ,यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सुप्रिया अपराध यांच्या अध्यक्षतेखाली ,सिने अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रजलन करून कार्यक्रम ला सुरुवात करण्यात आली.
यावेळी महिलांच्या पाककला स्पर्धेचे फीत कापून अभिनेत्री कांबळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यानी महिला जागृती नृत्य सादर केले,यावेळी पोलीस पाटील सौ संजना आंगणे ,ग्रामपंचायत सदस्या सौ अक्षता राणे ,वंदना पारकर,रिया नाईक,नेहा कुलकर्णी,दुर्वा शिंदे,पूजा आळवे , माजी ग्रामपंचायत सदस्य राणे मॅडम तसेच गावातील महिला व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर कदम व सहकारी शिक्षक यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते .
यावेळी सौ कांबळी यांनी उपस्थित महिलांना स्वावलंबन आणि आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.
पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक संजना लक्ष्मण आंगणे द्वितीय क्रमांक संगीता अपराध आप्पे तृतीय क्रमांकअक्षता राणे उत्तेजनार्थ रसिका तांबे, प्रगती परब यांना यश मिळाले.
द बेस्ट डिश सुप्रीया आलव यांना मिळाला या कार्यक्रमामध्ये रश्मी आंगणे शाळा चाफेड भोगले वाडी निकिता जठार बोर्डवे नंबर 3 घोरपडे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला तर विशेष सन्मान कार्यक्रमाच्या प्रमुख प्रमुख सौ. अक्षता कांबळी यांचा अध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी वरील मान्यवरांनी निमित्त शुभेच्छा दिल्या व शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दळवी मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक किशोर कदम यांनी केले व आभार शिक्षिका राजश्री तांबे व मडव मॅडम यांनी मानले महिलांनी संगीत खुर्ची खेळून कार्यक्रमाची सांगता केली .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)