सैनिक नागरी सहकारी पतसंस्था शिरगाव शाखेत एटीएम सुविधा सुरू.
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगांव येथील सैनिक नागरी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या बँकेच्या शिरगाव शाखेत नुकतीच एटीएम ही सुविधा सुरू झाली असून त्याचे उदघाटन शिरगावचे उपसरपंच अमित साटम व शिरगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दादा पारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.या सुविधेबरोबर या बँकेत आरबीआय स्वीकृत सुरक्षित पिन आधारित व्यवहार, आरटीजीएस, एनइएफटी, क्यूआर कोड, मोबाईल बँकिंग,एसएमएस, रिचार्ज,बिल पेमेंट आदी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.तसेच या बँकेत भारतातील सर्व बँकांचे डेबिट कार्ड्स स्वीकारले जातील.यावेळी शाखाव्यवस्थापक राजेश सावंत,दमयंती राणे,कुलदीपक घाडीगांवकर,तुषार चव्हाण,सिद्धी इंदप, मयूर सावंत,रघुनाथ साटम,दिगंबर तावडे आदींसह कर्मचारी, ग्राहक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)