ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
जिल्ह्यातील १३५ परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्ती सराव परीक्षा  ; २०७० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्ह्यातील १३५ परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्ती सराव परीक्षा ; २०७० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

प्रकाशन: 03 Mar 2022 08:17 PM
वाचन संख्या 33

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने इ 5 वी साठी जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 135 परीक्षा केंद्रावर http://localhost/news/public/uploads/2070 विद्यार्थ्यांना या सराव परीक्षेत सहभाग घेतल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम यांनी दिली. शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजनासाठी सौ संजना सावंत अध्यक्षा जि प सिंधुदुर्ग, डॉ सौ अनिषा दळवी सभापती शिक्षण व आरोग्य जि प सिंधुदुर्ग यांनी परवानगी दिल्याने शिक्षक समितीने विशेष आभार मानले आहेत. कोवीड काळानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील इ 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेस सन http://localhost/news/public/uploads/2021-22 साठी पात्र विद्यार्थ्यांच्या सरावासाठी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजन करणारी प्राथमिक शिक्षकांची एकमेव संघटना ठरली आहे. सराव परिक्षेची खास वैशिष्ट्ये जिल्हयातील 8 ही तालुक्यातील इ 5 वी जि प शाळांमधील http://localhost/news/public/uploads/2070 विद्यार्थी 135 परिक्षा केंद्रावर सहभागी झाले होते. यामध्ये कुडाळ 315 विद्यार्थी 24 परिक्षा केंद्र, सावंतवाडी 426 विद्यार्थी 19 केंद्र, वेंगुर्ला 303 विद्यार्थी 14 केंद्र, देवगड 282 विद्यार्थी 22 केंद्र, कणकवली 254 विद्यार्थी 22 केंद्र, मालवण 240 विद्यार्थी 21 केंद्र, वैभववाडी 128 विद्यार्थी 3 परीक्षा केंद्र, दोडामार्ग 122 विद्यार्थी 10 केंद्राचा समावेश होता. शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मराठी विषय बाळकृष्ण नांदोस्कर (पेंडूर संयुक्त मोगरणे, मालवण) ,रामचंद्र कुबल (आडवली नं 1 मालवण) ,गणित विषय संतोष नेरकर (आमडोस कदमवाडी मालवण) ,भरत काणेकर (मठ पाणलोस मालवण), इंग्रजी विषय सौ श्रध्दा वाळके (मसुरे भोगलेवाडी मालवण) ,बुध्दिमत्ता विषय विलास सरनाईक (नांदरूख आमडोस मालवण) या प्राथमिक शिक्षकांनी विशेष मेहनत घेऊन तयार केल्या आहेत. शिक्षक समितीने या सराव परिक्षेचा संपूर्ण खर्च केलेला असून जिल्ह्यातील 135 परीक्षा केंद्रांवर परीक्षेस बसलेल्या http://localhost/news/public/uploads/2070 विद्यार्थ्यांना व पालकांनाही अल्पोपहार व्यवस्था केलेली होती. प्रत्येक तालुक्यातून टाॅप 10 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाणार असून जिल्हास्तरीय टाॅप 10 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा संघटनेच्या वतीन गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी स्पष्ट केले. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी नेहमीच आक्रमक असलेली शिक्षक समिती जिल्हयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेसारखे विविध नाविण्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवित असलेबाबत पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या सराव परीक्षा आयोजनासाठी संघटनेच्या सर्व तालुका, जिल्हा पदाधिकारी, राज्य पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे. सर्व तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांनीही मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल शिक्षक समिती सिंधुदुर्ग ने आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स