युवासेना सांगवे- कनेडी शहरप्रमुख पदी दिनेश वाळके यांची निवड तर युवासेना सांगवे शाखाप्रमुख पदी तुषार गांवकर व संजय तोरस्कर उर्फ राजू पाटील.
चिंदर | विवेक परब : हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख मा. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार खासदार तथा शिवसेना सचिव विनायकजी राऊत साहेब, युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई, जिल्हासंपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार युवासेना कणकवली तालुका समन्वयक पदी तेजस राणे यांना बढती देण्यात आली आहे तर कणकवली शहरप्रमुख पदी आदित्य सापळे तर उपशहरप्रमुख पदी सोहम वाळके यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना सांगवे- कनेडी शहरप्रमुख पदी दिनेश वाळके तर युवासेना सांगवे शाखाप्रमुख पदी तुषार गांवकर व संजय तोरस्कर उर्फ राजू पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी नुकतेच दिले आहे.यावेळी त्यांच्या समवेत महिला आघाडी जिल्हा संघटक मधुरा पालव, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, युवा तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, तालुका समन्वयक गुरुनाथ पेडणेकर, शहरप्रमुख शेखर राणे, नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर, वैभव मालंडकर, योगेश मुंज, भूषण परुळेकर, दिव्या साळगावकर, प्रसाद अंधारी, महेश कोदे, भिवा परब, बाबू जाधव, चेतन अंधारी, चेतन मुंज, श्रीपाद सापळे, गुरू वाळके, मयूर पेडणेकर, विशाल कसालकर, परेश बागवे, जय शेट्ये आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवासेनेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)