साळशी मुख्य रस्ता ते आपटा पार रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन.
शिरगांव |संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी येथील मुख्य रस्ता ते आपटा पार पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन आमदार स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या रस्त्यांच्या कामासाठी सुमारे १० लाखाचा निधी आमदार नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिला असून, आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर श्रीफळ वाढवून कामाची सुरुवात केली.
कोकणच्या विकासासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू!
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज प्रथमच कोकणात आलो आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांनी केलेला सत्कार स्वीकारला.याचा मला खूप आनंद होत आहे. असे प्रतिपादन आमदार प्रसाद लाड यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी त्यांनी साळशी येथील श्री सिद्धेश्वर-पावणाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले.याप्रसंगी आमदार नितेश राणे,भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,भाजपा देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,साळशी सरपंच वैभव साळसकर,उपसरपंच अनंत नाईक,शिरगाव उपसरपंच अमित साटम,माजी जि. प.सदस्य सुभाष नार्वेकर,साळशी माजी सरपंच सत्यवान सावंत,मंगेश लोके,संतोषकुमार फाटक आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)