ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा-बळवंतनगर येथून बेपत्ता झालेला गोव्यात सापडला

बांदा-बळवंतनगर येथून बेपत्ता झालेला गोव्यात सापडला

प्रकाशन: 01 Mar 2022 10:37 PM
वाचन संख्या 28

बांदा /राकेश परब : बांदा-बळवंतनगर येथून २५ फेब्रुवारीपासून बेपत्ता झालेला युवक साईप्रसाद प्रदीप बांदेकर (वय २६) पणजी-गोवा येथे सापडला आहे. गोव्यात नोकरीनिमित्त असलेले बांद्यातील युवक दिनेश नाईक व रमीज शेख यांना हा युवक आज दुपारी सापडला.

२५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घरातून फिरायला बाहेर जातो असे सांगून गेला तो अद्याप घरी परताला नसल्याची तक्रार वडील प्रदीप बांदेकर यांनी बांदा पोलिसात दिली होती. त्यानंतर या युवकाची शोधाशोध सुरू होती. आज दुपारी दोन्ही युवकांना साईप्रसाद बांदेकर सापडला. त्यांनी याची कल्पना बांदा सरपंच अक्रम खान यांना दिली. युवकाला ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक गोव्यात रवाना झाले आहेत. नाईक व शेख या दोन्ही युवकांच्या समयसुचकतेचे सरपंच खान यांनी कौतुक केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स