वैभववाडीतील तरुणांचा युक्रेनहुन रोमानियात अथक पायी प्रवास तर बहीण दिल्लीत दाखल
वैभववाडी /प्रतिनिधी: वैभववाडी येथील कोकिसरे गावातील पांडुरंग जानू काळे यांची दोन मुले युक्रेन हुन परतीच्या प्रवासाला निघाली आहेत.काळे यांची कन्या आसावरी काळे ही युक्रेन वरून दिल्लीत दाखल झाली आहे.तर मुलगा दीपराज हा युक्रेनवरून दहा तास पायी प्रवास करीत रोमानिया देशात रविवारी सकाळी दहा वाजता पोचला आहे.तो लवकरच मुंबईत पोचेल.पांडुरंग काळे यांची दोन्ही मुले युक्रेन येथे एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेली होती.ती दोन्ही मुल परतीच्या प्रवासाला निघाली आहेत.पांडुरंग काळे यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)