ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
वरवडे फणसवाडी ट्रान्सफॉर्मर अखेर कार्यान्वित..
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वरवडे फणसवाडी ट्रान्सफॉर्मर अखेर कार्यान्वित..

प्रकाशन: 16 Aug 2021 01:57 PM
वाचन संख्या 64

सोनू सावंत यांच्या इशाऱ्यानंतर झाले काम

कणकवली | उमेश परब : वरवडे गावामधील वीजपुरवठा सातत्याने खंडित होण्याबाबत भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली होती. यावेळी फणसवाडीतील ट्रान्सफॉर्मरचा  विषय  तातडीने मार्गी न लागल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानुसार चार दिवसात हा प्रश्न मार्गी लागला आहे. रविवारी या ट्रान्सफॉर्मरचा शुभारंभ पंचायत समिती सदस्या राधिका सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, हनुमंत बोन्द्रे,अमोल बोन्द्रे, प्रदीप घाडीगांवकर, सिरील फर्नाडिस, प्रमोद गावडे, पोलीस पाटील , अभि पडते ,दिलीप चव्हाण, रुजया बारीस, वालावलकर मॅडम, कुंभार,लवेश पवार,राजम , कारंडे , मदन मेस्त्री,विजय कदम, मधुकर परब,संदिप मेस्त्री, सादिक कुडाळकर, सचिन घाडीगांवकर, विवेक राणे, आदी उपस्थित होते. 
ट्रान्सफॉर्मर साठी गेली दोन वर्षे प्रयत्न केल्यानंतर काम करण्यात आले. मात्र किरकोळ कामासाठी वर्षभर हा विषय प्रलंबित होता. यामुळे या भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत अनेक उपकरणे निकामी झाली होती. त्यामुळे सोनू सावंत यांच्या इशाऱ्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला आहे. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स