मुंबई मनपाचा दिलासादायक निर्णय
मुंबई |ब्यूरो न्युज : रविवार १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवास सुरू केला आहे. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आणखी एक दिलासा मिळाला आहे . १६ ऑगस्ट म्हणजेच सोमवारपासून सर्व उद्याने, मैदाने , समुद्र किनारे व चौपाट्या खुल्या केल्या आहेत. सायंकाळी ६ ते १० या वेळेत हे सर्व खुले करण्यात आले आहे . परंतु महानगरपालिकेने काही नियम व अटी लागू केले आहेत त्याचे पालन करणे नागरिकांना अनिवार्य असणार आहे. यामध्ये सामाजिक अंतर , मास्कचा वापर करणे व इतर उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)