ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत सिंधुदुर्गात...!

सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत सिंधुदुर्गात...!

प्रकाशन: 25 Feb 2022 12:21 AM
वाचन संख्या 115

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांचे आगमन होणार आहे. 26 व 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करण्यासाठी  सरसंघचालक येथे पूर्ण वेळ उपस्थित असणार आहेत.

सरसोली धाम ,कुडाळ येथे सरसंघचालक येत असून संघाच्या ठराविक वर्गाच्या रचनेसाठीच हे प्रशिक्षण आहे.
कार्यकर्ता प्रशिक्षण हा संघाच्या कार्यपद्धतीचा एक अविभाज्य भाग आहे. संघाचे दैनंदिन काम, नैमित्तिक उपक्रमांच्या प्रभावी  संचलनात या प्रशिक्षण सत्राचे मोठे योगदान असते.
कोकण प्रांतातील संघचालक जबाबदारी भूषविणा-या सर्व  कार्यकर्त्यांचे या निमित्ताने एकत्रीकरण  होणार आहे. सरसंघचालकांसह संघाचे सहसरसंघचालक अरुणकुमार व महाराष्ट्र, गोवा, गुजरात या रांज्याच्या समावेश असलेल्या पश्चिम क्षेत्राचे संघचालक डाॅ. जयंतीभाई भडेसिया हे देखील या प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहाणार आहेत.
संघचालक हा संघाच्या कार्यकर्त्यांचा पालक कार्यकर्ता समजला जातो.
तालुका, जिल्हा, विभाग अशा विविध स्तरावरील कामात सरसंघचालकाची महत्त्वाची भूमिका असते. बहुतेकदा समाजातील जबाबदार लोकांकडे याचे दायित्व सोपवले जाते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स