ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
युवासेना उंबर्डे, कोकिसरे, लोरे विभागाची आढावा बैठक संपन्न.

युवासेना उंबर्डे, कोकिसरे, लोरे विभागाची आढावा बैठक संपन्न.

प्रकाशन: 24 Feb 2022 11:50 PM
वाचन संख्या 74

जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतला गावनिहाय आढावा..

कोळपे जि. प. विभागप्रमुख पदी आकाश गुरव..

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या उंबर्डे, कोकिसरे, लोरे जिल्हा परिषद मतदार संघातील युवासेना पदाधिकार्यांची आढावा बैठक जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत प्रत्येक गावात युवासेनेचे शाखाप्रमुख नियुक्ती करणे, प्रत्येक विभागात युवासेनेचे फलक लावणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी पोलीस अधिकारी श्री. संदीप सरवणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सुशांत नाईक व श्री. संदीप सरवणकर यांचा विभागाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार करण्यात आला. यावेळी रिक्त पदाधिकारयांच्या नियुक्त्या जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी जाहीर केल्या. यामध्ये कोळपे जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी आकाश सीताराम गुरव, कोकिसरे पंचायत समिती उपविभागप्रमुख पदी राजेश सखाराम पवार, दिगशी शाखाप्रमुख पदी सागर सतीश पवार, हेत शाखाप्रमुख पदी सुशील परशुराम कदम, मौदे शाखाप्रमुख पदी योगेश दत्ताराम कदम, सांगुळवाडी शाखाप्रमुख पदी गणेश जयराम राऊत, खांबाळे पंचायत समिती उपविभागप्रमुख पदी निखिल चंद्रकांत मोरे, लोरे नं-२ च्या शाखाप्रमुख पदी, उपशाखाप्रमुख पदी अमोल प्रकाश गोरुले यांच्या नियुक्त्या केल्या असून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी पोलीस अधिकारी संदीप सरवणकर, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी, तालुकाप्रमुख अतुल सरवटे, तेजस राणे, लोरे सरपंच विलास नावळे, जि. प. सदस्या दिव्या पाचकूडे, सिद्धू गावडे, रोहित रावराणे, सिद्धेश रावराणे, विशाल राणे, वसंत मोरे, प्रथमेश तळेकर, गणेश धुरी, ओमकार इस्वलकर यशवंत गवाणकर, चंद्रकांत आमरसकर, श्रीकांत डाफळे, समाधान काडगे, शंकर कोकरे, अनिल नराम, रुपेश पाचकूडे, दिलीप मांजलकर, जयेश पवार, सत्यवान सुतार, युवराज रावराणे आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स