ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आचरा (हिंदळे) येथील श्री. राघोजी दामोदर प्रभू कालवश..

आचरा (हिंदळे) येथील श्री. राघोजी दामोदर प्रभू कालवश..

प्रकाशन: 24 Feb 2022 06:36 PM
वाचन संख्या 90

मुणगे गांवच्या भगवती हायस्कूलचे होते माजी मुख्याध्यापक..

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदळे,आचरा गांवच्या ‘बाणाची कोनी’ येथील रहिवाशी श्री. राघोजी दामोदर प्रभू (72) यांचे आज मध्यरात्री 1 वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
श्री. राघोजी दामोदर प्रभू हे देवगड तालुक्यातील मुणगे गांवच्या भगवती हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक होते.
त्यांच्या शिक्षकी सेवाकाळात अनेक समाजोपयोगी ,सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधील त्यांच्या योगदानासाठी ते देवगडव मालवण तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकप्रीय होते.
आचरा तिठा येथील भाग्यश्री मेडिको सेंटर व्यावसायिक सौ.वर्षा सांबारी यांचे ते वडिल व श्री. मांगिरीश सांबारी यांचे ते सासरे होत.
श्री.राघोजी दामोदर प्रभू यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,मुलगा,जावई व नातवंडे असा परिवार आहे.
श्री प्रभू यांच्या निधनाने आचरा व मुणगे परिसरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स