ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
उद्याचा केंद्र सरकारचा 'एम.एस.एम.ई. विभागाचा' उद्योजक विकास कार्यक्रम जिल्ह्यातील व्यापारी,नवउद्योजकांसाठी  दिशादर्शक : श्री विष्णू मोंडकर
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

उद्याचा केंद्र सरकारचा 'एम.एस.एम.ई. विभागाचा' उद्योजक विकास कार्यक्रम जिल्ह्यातील व्यापारी,नवउद्योजकांसाठी दिशादर्शक : श्री विष्णू मोंडकर

प्रकाशन: 24 Feb 2022 07:06 PM
वाचन संख्या 81

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिह्यातील ओरोस येथे शुक्रवार दिनांक २५ फेब्रुवारीला सकाळी १० ते ४ यावेळेत होणाऱ्या शरदकृषी भवन येथे होणाऱ्या ‘एमएसएमई उद्योजगता विकास कार्यक्रम’ हा जिल्ह्यातील व्यापारी वर्गासाठी दिशादर्शक ठरणारा असून अशा प्रकारचा केंद्र सरकारच्या माध्यमातून पहिलाच कार्यक्रम सिंधुदुर्ग जिह्यातील व्यापारी वर्गासाठी होत आहे .कोरोना काळानंतर जिल्ह्यातील उध्वस्त झालेल्या व्यापारी वर्गासाठी केंद्र सरकारचे आश्वासक दिशेने पाहता येईल.सदर विभागाचे ७० पेक्षा जास्त मुख्य अधिकारी उपस्थित राहून उद्योजकांना व्यावसायिक मार्गदर्शन करणार आहेत आतापर्यत एमएसएमई विभागाशी व्यापारी वर्गाचा ऑनलाईन कर्ज प्रकरण करणे एवढाच सहभाग येत होता.उद्या होणाऱ्या कार्यक्रमात उद्योजकांना कर्ज विषयी मार्गदर्शन सबसिडी नाविन्यपूर्ण प्रकल्प विषयी मार्गदर्शन दिले असून व्यावसायिक वर्गाने एकत्र येऊन कॅस्टर च्या माध्यमातूम रोजगार निर्मिती ,पर्यटन,व्यापारी,महिला बचत गट,नवउद्योजक यांना १० लाख ते २५० कोटी रुपयांपर्यंत कर्जयोजना त्यावर मिळणारे व्यवसाय वाढीसाठी मिळणारे अनुदान याविषयी माहिती दिली जाणार आहे .सदर उद्योजक विकास कार्यक्रम जिल्ह्यातील व्यापारी महिला ,बचतगट,प्रोसेसिंगयुनिटधारक,पर्यटन व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी आर्थिक सक्षमता व व्यवसाय वाढीसाठी दिशादर्शक ठरेल यांसाठी सर्व व्यापारी वर्गाने तसेच महासंघाच्या सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री विष्णू मोंडकर जिल्हाध्यक्ष.पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स