काळशात पलटला डंपर...!
चौके | अमोल गोसावी : चौके येथून कुडाळच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा डंपर पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान काळसे होबळीचा माळ येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्यानजीकच्या शेतामध्ये पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून डंपरच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. तसेच डंपर आणि त्यातील चिरे शेतजमीनीत कोसळल्यामुळे त्याठिकाणच्या भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)