ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत ३६० खेड्यांचा अधिपती श्री देव जैन भरतेश्वर जाणार कुणकेश्वर भेटीला..!

कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत ३६० खेड्यांचा अधिपती श्री देव जैन भरतेश्वर जाणार कुणकेश्वर भेटीला..!

प्रकाशन: 23 Feb 2022 02:24 PM
वाचन संख्या 79

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत ३६० खेडयांचा अधिपती श्रीदेव जैन भरतेश्वर श्री देव’ देवगड तालुक्यातील श्री. कुणकेश्वर भेटीसाठी २७ फेब्रुवारी २०२२ रोजी निघणार आहे.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी
२.०० वा. मसुरे श्री. पावणाई मंदिर येथून प्रस्थान, मसुरे भगवंतगड मार्गे आचरे येथे सायं. ५.०० वा. आगमन व इनामदार श्री. देव रामेश्वरची भेट, आचरे येथे रात्रौ विश्रांती असणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी
सकाळी ९.०० वा.आचरे येथून प्रस्थान व मुणगे येथे ११.०० वा. आगमन व श्री देवी भगवती देवी भेट, दुपारी १२.१५ वा. मुणगे येथून प्रस्थान व १.३० वा. हिंदळे येथे श्री काळभैरव देवालय भेट व विश्रांती. सायं. ५.०० वा. मिठबांव येथील रामेश्वर भेट व रात्रौ विश्रांती असणार आहे. ०१ मार्च रोजी सकाळी ९.०० वा.मिठबांव येथून प्रस्थान व ३.४५ ला श्री देवी गजबादेवी भेट, सायं. ५.३० वा. श्री. देव कुणकेश्वर भेट व रात्री श्री. धुवाळी यांचे घरी विश्रांती. ०२ मार्च रोजी
सकाळी ८.३० वा.पवित्र समुद्र तिर्थ स्नान देवस्वारी व प्रस्थान व श्री. देव कुणकेश्वर कडे निरोपाची भेट. दुपारी १२.०० वा नारींग्रे येथे आगमन व श्री. देव गांगेश्वर भेट व विश्रांती, दुपारी २.३० वा. बांदिवडे कडे प्रस्थान व श्री. देवी पावणाई व श्री देव लखमेश्वर भेट व ४.३० वाजता मसुरे येथे आगमन होणार आहे. उपस्थितीचे आवाहन मसुरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभुगांवकर व संग्राम प्रभुगावकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स