ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुणगे येथे केले ७५ दात्यांनी  रक्तदान..!

मुणगे येथे केले ७५ दात्यांनी रक्तदान..!

प्रकाशन: 23 Feb 2022 11:53 AM
वाचन संख्या 76

मुणगे प्रिमिअर लीग विश्वस्थ मंळाचे आयोजन.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे प्रिमिअर लीग विश्वस्थ मंळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात पच्याहत्तर रक्तदात्यानी रक्तदान केले. येथील श्री देवी भगवती देवस्थानच्या त्रैवार्षिक सत्यनारायण महापुजेचे निमित्ताने देवी भगवती मंदीर लगतच्या भक्तनिवास मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन देवी भगवती देवस्थानचे अध्यक्ष दिलीप महाजन व सचीव दिलीपकुमार महाजन यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी देवस्थान समीतीचे सदस्य देवदत्त पुजारे, दिगंबर पेडणेकर,तसेच मुणगे प्रिमिअर लीग विश्वस्थ मंडळाचे समिर महाजन, निषाद परूळेकर, शंकर मुणगेकर, आशिष आईर, आनंद वळंजू, केदार उर्फ साई वळंजू, नारायण सावंत, दिनेश सावंत, दुलाजी सावंत, योगश लब्दे ,रविंद्र आईर,निलेश शेट्ये, कोल्हापूर विभागिय रक्त पेढीचे जयवंत कदम व त्यांचे सहकारी आणि विश्वस्थ मंडळाचे सभासद आदी उपस्थित होते. शासकिय वैद्यकीय महाविद्यालय सी.पी आर .हाँस्पिटल विभागिय रक्तपेढी कोल्हापूर याच्यावतीने दात्यांचे रक्त संकलीत करण्यात आले. देवस्थान विश्वस्थ देवदत्त पुजारे म्हणाले, रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान असून या रक्तामुळे प्रसंगी कोणाच्या तरी आई, वडील, भाऊ, बहिण, पत्नी, मुलगा यांचा जीव वाचू शकतो. मुणगे सारख्या खेडे गावामध्ये मुणगे प्रीमिअर लीग विश्वस्थ मंडळाने हा चांगला उपक्रम गावात राबविला असून मंडळास शुभेच्छा दिल्या. यावेळी मुणगे, मिठबांव, हिंदळे, तसेच पोयरे ,मशवी आदी गावातील तरूणानी रक्तदान केल्याबद्दल रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स