ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांत व्ही. एन. नाबर प्रशालेचे घवघवीत यश.

शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांत व्ही. एन. नाबर प्रशालेचे घवघवीत यश.

प्रकाशन: 23 Feb 2022 11:36 AM
वाचन संख्या 70

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या बांदा विभाग आयोजित विविध स्पर्धांत श्री मंगेश रघुनाथ कामात चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल ,बांदा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले . पहिली ते चौथी गटात वेशभूषा स्पर्धेत वैभवी सुभाष धुरी हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला ,तर पोवाडा गायन स्पर्धेत अथर्व सावंत याने प्रथम ,अस्मि देसाई हिने तृतीय क्रमांक मिळवला. इयत्ता पाचवी ते सातवी गटात वेशभूषा स्पर्धेत संस्कार शिरोडकर याने प्रथम ,दर्शील राऊळ याने द्वितीय तर सानवी राऊळ हिने तृतीय क्रमांक मिळवला . वक्तृत्व स्पर्धेत अथर्व नेमळेकर याने द्वितीय तर चित्रकला स्पर्धेत अधिराज गवळे याचे चित्र लक्षवेधी ठरले. रांगोळी स्पर्धेत अमोल गाड याने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. खुल्या गटात प्रशालेच्या शिक्षिका सौ रिना मोरजकर यांनी वक्तृत्व आणि वेशभूषा स्पर्धांत प्रथम क्रमांक मिळवला . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका रीना मोरजकर तसेच दीक्षा नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मनाली देसाई ,सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स