मुणगे गांवचा चिन्मय दळवी सीए परीक्षेत ठरला यशवंत..!
अष्टपैलू चिन्मयवर होतोय कौतुकाचा वर्षाव..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील मुणगे बांबरवाडीतील चिन्मय सुभाष दळवी याने सनदी लेखापाल परीक्षेत उत्तीर्ण होत यश प्राप्त केले आहे. मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेऊन बी.कॉम मध्ये ७६% गुण मिळवून त्याने सीए परीक्षेची तयारी सुरु केली होती.
त्याला मल्लखांबची आवड आहे. मुंबई संघाकडून तीन वेळा त्याने राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत भाग घेतला होता. त्याच्या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)