ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सौ.ज्योती रविकिरण तोरसकर बुवा यांचा राष्ट्रीय स्तरावरील नेट-जेआरएफ परीक्षेत मराठी विषयात देशात चौदावा क्रमांक...!

सौ.ज्योती रविकिरण तोरसकर बुवा यांचा राष्ट्रीय स्तरावरील नेट-जेआरएफ परीक्षेत मराठी विषयात देशात चौदावा क्रमांक...!

प्रकाशन: 22 Feb 2022 10:51 AM
वाचन संख्या 220

मालवण | ब्युरो न्यूज : १९ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झालेल्या युजीसी नेट-जेआरएफ परीक्षेचे निकाल जाहीर झाले. यामध्ये अ.शी.दे .टोपीवाला हाय स्कूल मध्ये सहा.शिक्षिका म्हणून गेली वीस वर्षे कार्यरत असलेल्या सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी राष्ट्रीय पातळीवर सहा.प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप पदासाठी झालेल्या(नेट-जेआरफ)परीक्षेत, मराठी या विषयात यश मिळवले आहे.यापूर्वी झालेल्या सेट परीक्षेत इतिहास आणि मराठी या विषयात त्याना यश मिळाले होते.मराठी व इतिहास या दोन्ही विषयात सेट आणि राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या( नेट-जेआरएफ) परीक्षेत यश मिळवणाऱ्या काही मोजक्या व्यक्ती मध्ये त्यांचा समावेश झाला आहे.सदर परिक्षा ही केंद्र सरकारच्या अख्त्यारित असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग(UGC) युजीसी मार्फत एकुण ८४ विषयांसाठी घेतली जाते.
डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या सदर परीक्षेसाठी  संपूर्ण भारता मधून ६,७१,२८८ बसले होते त्यापैकी ५२,८५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ७.८७% एवढा लागला आहे.मराठी विषया साठी झालेल्या नेट परीक्षेमध्ये सम्पूर्ण भरता मधून २५२५ पैकी फक्त १९५(७.७२%)यामध्ये  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सौ. ज्योती यांना प्राप्त गुण आणि सर्व प्रवर्गांचा कट ऑफ याचा विचार केला तर मराठी विषया मध्ये त्या चौदाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.     
राज्यस्तरीय सेट परीक्षेत मराठी व इतिहास या विषया बरोबरच राष्ट्रीय पातळीवरील नेट(मराठी) या परीक्षेमध्ये सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे.नेट-जीआरएफ परीक्षेत मिळालेल्या यशामुळे त्यांना भारतातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. लवकरच स्पर्धा परीक्षेतील आपल्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यां साठी मार्गदर्शन सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या बद्दल सर्व स्तरातून त्यांची प्रशंसा व अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स