ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
पर्यटन सुसज्ज आरमार बोटीचे उद्घाटन दिशाचक्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या हाती..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पर्यटन सुसज्ज आरमार बोटीचे उद्घाटन दिशाचक्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या हाती..!

प्रकाशन: 22 Feb 2022 10:34 AM
वाचन संख्या 80

आम.वैभव नाईक यांची मालवणच्या पर्यटन प्रगतीसाठी मुबलक निधीची मागणी..

चिंदर | विवेक परब : महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री नाम.आदित्य ठाकरे काल सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना चिपी विमानतळावर तसेच मालवणच्या शिवसेना शाखेसमोर खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना हार घालून पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले. महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाच्या एमटीडीसी अंतर्गत मालवण तारकर्ली येथे समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पदुच्चरीहून आणण्यात आलेल्या भारतातील पहिल्या आरमार नावाच्या बोटीचे उद्घाटन नाम. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.


तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या ताफ्यात हि अत्याधुनिक बोट असून यावेळी ना.आदित्य ठाकरे यांनी स्टेअरिंग हाती घेत बोट चालविण्याच्या आनंद घेतला. या बोटीत चेंजिंग रूम. अत्याधुनिक स्वच्छतागृह अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत. त्यामुळे बोटीच्या माध्यमातून रात्री सुद्धा स्कुबा डायव्हिंग करता येणार आहे. त्यामुळे पर्यटन जिल्ह्यात पर्यटनाचे आणखी एक दालन खुले झाले आहे. तद्नंतर तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरला ना. आदित्य ठाकरे यांनी भेट देत उपलब्ध अत्याधुनिक उपकरणे व सामग्रीची, तसेच स्कुबा डायव्हिंग टॅंकची पाहणी केली. एमटीडीसीच्या इमारतीवरून समुद्र किनारपट्टी व एमटीडीसी परिसराची पाहणी केली. याप्रसंगी तारकर्ली, देवबाग, मालवण येथील पर्यटन व्यवसायिकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांची निवेदने दिली. वायरी जि.प.शाळा येथे ना.आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्याचबरोबर मालवणच्या पर्यटन विकासासाठी भरघोस निधी देण्याची मागणी यावेळी आ.वैभव नाईक यांनी ना.आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.
यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते , जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, जलपर्यटन विभागाचे दिनेश कांबळी, साहसी पर्यटन क्षेत्राचे रोहित आयरे, एमटीडीसीचे डॉ. सारंग कुलकर्णी, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बबन शिंदे, हरी खोबरेकर, अमित पेडणेकर, सुशांत नाईक, महेश कांदळगावकर, नितीन वाळके, मंदार केणी,बबन बोभाटे, मंदार शिरसाट,यतीन खोत, रुपेश पावसकर, रमेश कद्रेकर, अनिल केळुसकर आदींसह शिवसेना,युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स