ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बिबवण्यानजिक कारचा भीषण अपघात..!

बिबवण्यानजिक कारचा भीषण अपघात..!

प्रकाशन: 19 Feb 2022 07:37 PM
वाचन संख्या 149

कलिंगड स्टाॅलला धडकली कार..!

कुडाळ | सुयोग पंडित : मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळनजिक बिबवणे रस्त्यावर एक कार ( क्रमांक :MH 07-Q 0392) पलटून भीषण अपघात झाला .
सायंकाळी 05:00 वाजल्याच्या सुमारास झालेल्या या अपघाताची तीव्रता एवढी होती की कार पलटून जवळपास http://localhost/news/public/uploads/20 फूट घासत जाऊन महामार्गावरील एका कलिंगडाच्या स्टाॅलला धडकली.
चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.


या अपघातात कारमधील दोघांना गंभीर ईजा झाली असून त्यांना बांबुळी येथे उपचारासाठी नेले गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ज्या कलिंगड स्टाॅलला ही काल धडकली त्यात ग्राहक म्हणून आलेल्या कुटुंबातील एका लहान मुलीच्या पायालाही गंभीर ईजा झाल्याने तिला त्वरीत कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात हलविल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
स्थानिक नागरीकांनी बचावासाठी धाव घेतली आणि जखमींना हलविण्यात मदत केल्याचे समजते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स