ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरीत करण्याची सर्वानी शपथ घेऊया :-समीर नलावडे..

शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरीत करण्याची सर्वानी शपथ घेऊया :-समीर नलावडे..

प्रकाशन: 19 Feb 2022 03:47 PM
वाचन संख्या 53

सकल मराठा समाजाच्यावतीने शिवजयंती साजरी;मान्यवरांनी केले अभिवादन…

कणकवली / उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचिफ)- छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा प्रश्न आहे,आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.शिवाजी महाराज रयतेसाठी लढले, आता आम्हाला छत्रपती साठी लढायला पाहिजे.पुढच्या वर्षांपूर्वी या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी शपथ घेऊयात असे प्रतिपादन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज समाजाच्या वतीने शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी शिवछत्रपती यांच्या पुतळ्यास एस.टी.सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विविध स्पर्धा व कार्यक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर,मराठा समाज नेते एस.टी. सावंत, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, लवू वारंग,सकल मराठा समाज अध्यक्ष भाई परब,सुशील सावंत,सोनू सावंत,महेंद्र सांब्रेकर, बबलू सावंत,एस.एल.सकपाळ,महेश सावंत,नगरसेवक सुशांत नाईक,बाबू गायकवाड,बँक संचालक समीर सावंत, बच्चू प्रभुगावकर, महेंद्र गावकर,नगरसेविका मेघा गांगण,कविता राणे,मेघा सावंत,माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम,अशोक करबळेकर,किशोर राणे,डॉ.सूर्यकांत तायशेट्ये,आनंद पारकर,संजय मालांडकर,प्रतीक्षा सावंत,राजश्री धुमाळे,तन्वी भावे,शैली सावंत,स्वाती राणे,प्रतिक्षा साटम,तेजस राणे, आदींसह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.

मराठा नेते एस.टी. सावंत म्हणाले,शिवाजी महाराज हे रयतचे राजा होते,त्याची कीर्ती जगभर होती.त्यांना रोखण्यासाठी मुस्लिम राष्ट्र प्रयत्न करत होते.त्यावर मात करत रत्यांनी स्वराज्याची स्थापना केली.केवळ मराठा समाजाचे राजा नव्हते,तर सर्व जाती धर्माचे आहेत.ते सर्व समाजाचे राहिले पाहिजेत.

शिवसेना नेते संदेश पारकर म्हणाले, हा उत्सव होत असताना शिवमय वातावरण झाले आहे.शिवाजी महाराज यांच्या बद्दल ची प्रेरणा घेण्यासाठी हे कार्यक्रम आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांनी चांगलं काम उभं केलं.स्वराज्य स्थापन केल्यामुळे आम्ही सन्मानाने जगतो आहे.त्यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला . तसेच वक्तृत्व , चित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स