ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवजयंती हा प्रत्येक कुटुंबाचा सोहळा म्हणून साजरी व्हायलाच हवी ; सिंधुरत्न फाऊंडेशनच्या अध्यक्ष व अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा शिवआग्रह.

शिवजयंती हा प्रत्येक कुटुंबाचा सोहळा म्हणून साजरी व्हायलाच हवी ; सिंधुरत्न फाऊंडेशनच्या अध्यक्ष व अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा शिवआग्रह.

प्रकाशन: 19 Feb 2022 03:10 PM
वाचन संख्या 75

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली जवळच्या जानवलीतील आदर्श नगर येथे ‘सिंधुरत्न फाऊंडेशन’ महाराष्ट्रच्या अध्यक्ष आणि हिंदी व मराठी सिने तसेच रंगभेमीवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ.अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त असलेल्या सौ. प्रभात पाताडे इतर महिलांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व पुष्पहार घालून शिवरायांचे पूजन करण्यात आले .


या वेळी सौ.अक्षता कांबळी यांनी उपस्थित महिलांना उत्तम मार्गदर्शन केले प्रत्येक महिलेने जिजाऊंच्या विचारांचा आदर्श घेऊन आपल्या मुलांना संस्कार द्यावेत शिवजयंती हा दिवस प्रत्येक घराघरात सण उत्सव म्हणून साजरा व्हावा असे आवाहन केले .


यावेळी सौ डॉ नीता रावण ,सौ मयुरा भंडारे ,सौ मिलन पाटील ,सौ सरिता पाटील ,सौ लक्षुमी गवस ,सौ जान्हवी परब ,सौ श्रद्धा पाटील ,सौ शीतल मुंज ,सौ स्नेहल तांबे , सौ अमिता राणे दळवी ,कु अर्चना राणे ,कु सुप्रिया पाटील ,कु अमिता राणे ,कु दिशा गोसावी ,कु सिद्धिका गोसावी,कु जान्हवी रावण ,कुमार अर्णव रावण उपस्थित  होते ,यावेळी ग्रंथीक काळसेकर व वेदांत मुंज यांनी शिवरायांच्या मावळ्यांची वेशभूषा करून कार्यक्रमात शिवसांस्कृतिक रंग भरले.
शेवटी सौ अमिता राणे दळवी यांनी सौ.अक्षता कांबळी आणि सर्व महिलांचे आभार मानून कार्यक्रम ची सांगता केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स