१९ फेब्रुवारी रोजी होणार विठ्ठलादेवी गांव नूतन ग्रामसचिवालय इमारतीचे उद्घाटन...!
छत्रपती शिवजयंतीचे औचित्य..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील ‘विठ्ठलादेवी गांव नूतन ग्रामसचिवालय’ इमारतीचे उद्घाटन सोहळा शिवजयंतीचे औचित्य साधून शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता माननीय श्री चंद्रकांत गोविंद नारकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती दुपारी दीड वाजता महाप्रसाद, सायंकाळी सात वाजता स्थानिक भजने. सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठलादेवी ग्रामपंचायतचे सरपंच दिनेश नारकर, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना देवगड तालुका संपर्क प्रमुख अनुरुद्र नारकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)