"राज्यावर अजून एका संपाचे सावट….!"
महाराष्ट्र राज्य पदवीधर व प्राथमीक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचा संप..!
23 व 24 फेब्रुवारीला तळ्यात मळ्यात न रहाता थेट संपात सामिल व्हायचे सर्व संघटनांना आवाहन. ..!
शिरगांव | संतोष साळसकर : महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात येत्या 23 व 24 फेब्रुवारी दिवशी एका राज्यव्यापी लाक्षणिक संपाची घोषणा केली गेलीआहे. या संपात ‘महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा’ सक्रिय सहभागी आहे.
राज्य शाखेने घेतलेल्या निर्णयाचे तंतोतंत पालन जिल्हा, तालुका शाखेस करावयाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा यात सक्रिय सहभागी राहील.काही शिक्षक संघटनांनी बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. काही संघटना काळ्या फिती लावून तळ्यात मळ्यात करण्याच्या भूमिकेत आहेत.अशा भूलथापांना बळी न पडता सर्वानी संपात सुट्टी न घेता, काळ्या फिती न लावता, प्रत्यक्ष “मी संपात सहभागी असल्याबाबत” मुख्याध्यापकांमार्फत वरिष्ठांना स्पष्ट कळवावे. मुख्याध्यापकांनी सर्वांचे अर्ज केंद्रप्रमुखांमार्फत कार्यालयात जमा करावेत.दोन दिवसांचे वेतन कपात होईल हे गृहीत धरूनच संपात सहभागी व्हावे. ज्यांना वेतन कपातीची भीती वाटते त्यांनी एस टी वर्कर्स यांचे चित्र डोळ्यासमोर आणावे. तरी सुद्धा वेतनाची भीती वाटत असेल तर संपात सहभागी होऊ नये. शासन वेगवेगळ्या मार्गांनी आपली एकी कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. पदवीधर शिक्षकांमध्ये सुद्धा PHd, net/set यांचा एक गट, MEd, MPhil, MA (edu)चा एक गट, BEd चा एक गट, MA, MSc, MCom चा वेगळा गट पाडण्याची नुकतीच माहिती मागवून सुरुवात झाली आहे. या अशा धोरणांना बळी न पडता सर्व पदवीधर, पदविप्राप्त, पदव्युत्तर शिक्षकांनी आपण सर्व एक समजून संपात सहभागी व्हावे. आपली संघटना गुणवंतांची संघटना म्हणून ओळखली जाते.विद्यार्थी हीत नेहमी डोळ्यासमोर ठेवून आपण सारे कार्यरत आहात.कोवीड 19 या महामारीत विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान झाले आहे.याचिही आपल्याला जाणीव आहे.असे असले तरी शासनाचे आपल्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.पेन्शन हा कामगाराला संविधानाने दिलेला हक्क असून शासन आपल्याला ती भिक स्वरुपात देवू पाहत आहे.पदोन्नत्ती,वेतन वाढ ,महागाई भत्ता,आरोग्य सुरक्षा असे शिक्षकांचे कितीतरी प्रश्न आज प्रलंबीत आहेत.
एकीकडे भष्टाचाराने थैमान घातले असुन सर्वसामान्यांच्या तोंडातला घास शासन हिसकावून घेवू पाहत आहे. या संपात सर्व केडरचे कर्मचारी जसे ग्रामसेवक,तलाठी,आरोग्य सेवक,बॅक कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स इ.सहभागी असल्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या समान समस्या मागणीमध्ये आहेत.सर्वात महत्वाची मागणी म्हणजे जुनी पेन्शन. ज्यांना जुनी पेन्शन लागू आहे त्यांची बंद होऊ नये यासाठी संपात सक्रिय सहभागी झाले पाहिजे.आपल्या रास्त मागण्यांसाठी संप करणे हा आपला संविधानाने दिलेला संवैधानिक मार्ग होय. हा आपला अधिकार आहेआणि म्हणुनच आपल्या न्याय्य हक्कांसाठी हजारोंच्या संख्येने संपात सहभागी होवून संप यशस्वी करा व दिल्लीच्या धर्तिवर महाराष्ट्राचा सर्वांगिण शैक्षणिक विकास साधन्यास हातभार लावावा असे आवाहन विजय भोगले,जिल्हाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा जिल्हा शाखा..सिंधुदुर्ग,अनंत राणे,सल्लागार, सुहास सावंत,सचिव,धोंडू रेडकर,कार्याध्यक्ष यांनी केले आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)