ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
युवा स्कुबा डायव्हरने घेतला गळफास..!

युवा स्कुबा डायव्हरने घेतला गळफास..!

प्रकाशन: 17 Feb 2022 02:00 PM
वाचन संख्या 457

समजू शकले नाही आत्महत्येचे कारण …!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चुनवरे गावठणवाडी येथील श्रीकृष्ण दिनेश परब (२९ वर्ष) या युवकाने बुधवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. मालवण येथे स्कुबा डायव्हर म्हणून काम करणारा श्रीकृष्ण हा बुधवारी सायंकाळी चार वाजता मालवण येथून आला होता. रात्री नऊ नंतर घराबाहेर पडल्यानंतर साडे अकरा वाजेपर्यंत तो दिसून न आल्यामुळे शोधाशोध केली असता घराच्या मागील बाजूस असलेल्या रातांब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत तो दिसून आला. मसुरे पोलिसांना याबाबत घटनेची फिर्याद त्याचा भाऊ अभय दिनेश परब यांनी दिली.
मसुरे पोलीस पी.बी. नाईक व विवेक फरांदे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणला. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेहावर अंतिम संस्कार चुनवरे येथे करण्यात आले. श्रीकृष्ण परब हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. मालवण पोलीस स्थानकाचे एपीआय एस. एस. चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास मालवण पोलीस अधीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस स्थानकाचे पी. बी नाईक व विवेक फरांदे करत आहेत

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स