ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्रीमती कमल वसंत जाधव करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मालवणचे शुभदा टिकम आणि सुशांत पवार 'ठसक्यात' झळकले...!

श्रीमती कमल वसंत जाधव करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मालवणचे शुभदा टिकम आणि सुशांत पवार 'ठसक्यात' झळकले...!

प्रकाशन: 13 Feb 2022 11:10 PM
वाचन संख्या 148

ब्युरो न्यूज | विवेक परब : ‘मनपा कलावंत संघटना’, मुंबई अंतर्गत कणकवली येथे संपन्न झालेल्या श्रीमती कमल वसंत जाधव करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या “ठसका” एकांकिकेला पुरुष व स्त्री अभिनयातील पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या एकांकिकेमध्ये महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पुरुष कलाकारामधे सुशांत पवार यांना तर स्त्री कलाकार म्हणून सौ. शुभदा टिकम यांना उत्कृष्ट अभिनय पुरस्काराने गौरविण्यात आले. या एकांकिकेमध्ये देवेन कोळंबकर, सचिन टिकम, शुभदा टिकम, सुशांत पवार, अभय कदम, जान्हवी बिरमोळे, प्रथमेश सामंत, मिताली नेरकर, सौम्या कुरले, लक्ष्मी नेरकर, एकनाथ तोडणकर, सर्वेश परुळेकर, ओम मालवणकर, अद्वैत टिकम आदी कलाकारांनी सहभाग घेतला होता. या एकांकिकेचे दिग्दर्शन प्रशांत केणी, नेपथ्य देवेन कोळंबकर व सर्वेश परूळेकर यांनी केले. तर पार्श्वसंगीत रोहित कुडे व सर्वेश परुळेकर यांनी दिले. ही एकांकिका चैतन्य देशपांडे यांनी लिहिली आहे. यावेळी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. हंबीरराव चौगले, सहायक प्रा. प्रमोद खरात तसेच किरण करवडकर, पंकज कवटकर, प्रवीण नडगेरी आदी विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत, सर्व प्राध्यापक, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, साईनाथ चव्हाण व इतर मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स