वैभववाडीतील सांगुळवाडीत शिवमहोत्सव 2022 चे होत आहे दमदार आयोजन…!
शिवरॅलीसोबतच कृषी प्रदर्शन,विज्ञान प्रदर्शन अशा अनोखे उपक्रमांचे आयोजन.
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही वैभववाडीतील सांगुळवाडी गावात ‘शिवमहोत्सव सांगुळवाडी’ या उपक्रमपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
19 फेब्रुवारी http://localhost/news/public/uploads/2022 रोजी छत्रपती शिवजयंतीचे औचित्य साधून यंदा शिवरॅली ,कृषी प्रदर्शन,विज्ञान प्रदर्शन,खाऊ गल्ली, शिवसत्कार,शिवसन्मान अशा उपक्रमांसोबतच अनेक वैचारिक व मनोरंजक मेजवानीने भरगच्च असा हा सोहळा असेल.
कार्यक्रमाची सुरवात सकाळी 09:00 वाजता ढोलपथकाच्या ‘शिवअभिवादन रॅलीने’ होईल. दुपारी 03:00 वाजल्यापासून कृषी प्रदर्शन,विज्ञान प्रदर्शन व खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी उशीरा 08:00 वाजता शिवसत्कार व शिवसन्मान वितरणाचा कार्यक्रम होईल ज्यात विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचाही समावेश आहे. या कार्यक्रमात मान्यवरांची मनोगते ऐकायचीही समाजसुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.
रात्री 09:00 वाजता राष्ट्रशाहीर हिंदुराव लोंढे (इचलकरंजी),शाहीरभूषण शिलाताई पाटील (पन्हाळा) आणि विद्या देवेकर ‘हिरकणी'(कागल) यांचे प्रबोधनपर पोवाडे सादर होतील.
राष्ट्रमाता जिजाऊ नगरी;पूर्व प्राथमिक शाळा क्रमांक 1 येथे या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)