मालवणात ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर संपन्न.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर स. का. पाटील महाविद्यालय मालवण याठिकाणी 13 फेब्रुवारीला संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्यामध्ये ‘ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन’ सिंधुदुर्ग यांनी जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात चांगले काम केले, त्यामुळे सिंधुदुर्ग संघटनेला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले.
आजच्या मार्गदर्शन शिबिराला संघटनेचे राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर, महाराष्ट्र राज्य सचिव संतोष शेटे, महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम, पुणे ऑफिस प्रमुख राकेश शिंदे उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर भारतरत्न कै. लता मंगेशकर व सिंधुदुर्गातील दशावतारी राजा कै. सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर यांनी संघटनेची सर्व माहिती व काम कसे करावे याचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांनी शंकांचे निरसन केले. जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षभरात केलेल्या कामाचा उल्लेख केला.
नूतन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र व ओळखपत्र राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर व राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या हस्ते देण्यात आले.
या सभेला उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष नारायण कुबल, जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, संघटक मंदार काणे तसेच मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, कणकवली तालुकाध्यक्ष हनिफभाई पिरखान, कुडाळ तालुकाध्यक्ष डॉक्टर अरुण गोडकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मोहिनी मडगांवकर त्याचप्रमाणे मालवण कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर, कुडाळ कार्याध्यक्ष डॉक्टर वैभव आहेर, पळसब सरपंच व मालवण तालुका संघटक चंद्रकांत गोलतकर, माजी सावंतवाडी तालुका अध्यक्ष अमेय मोर तसेच सर्व तालुका पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक सुभाष प्रभुखानोलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश धुरी यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)