आचरा रिक्षा संघटनेतर्फे १८ फेब्रुवारीला महापूजा.
ट्रिकसीन्सच्या प्रभावाने ‘स्मशान योगी ‘ दशावतारी नाट्यप्रयोग होणार सादर.
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा रिक्षा संघटनेतर्फे आचरा तिठा येथे सत्यनारायण महापुजा शुक्रवार दिनांक १८ फेब्रुवारीला आयोजित केली आहे. सकाळी १०वाजता सत्यनारायण महापूजा, १२वाजता आरती तिर्थप्रसाद, दुपारी १वाजता महाप्रसाद, ३ते६ महिलांनसाठी हळदिकुंकू, ६ते९ स्थानिक भजने व रात्रौ ९वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, कुडाळ-नेरुर यांचा ट्रीकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘स्मशान योगी’ होणार आहे. तरी रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन रिक्षा संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)