ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ओझर विद्यामंदिर येथे १५ फेब्रुवारीला माजी विद्यार्थी बैठक.

ओझर विद्यामंदिर येथे १५ फेब्रुवारीला माजी विद्यार्थी बैठक.

प्रकाशन: 13 Feb 2022 01:20 PM
वाचन संख्या 59

२४ एप्रिल २०२२ रोजी होणारा शाळेचा हिरक महोत्सव कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्याचा मुख्य मुद्दा..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील ‘ओझर विद्यामंदिर, कांदळगांव’ ही माध्यमिक शाळा हिरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. २४ एप्रिल २०२२ रोजी होणारा हिरक महोत्सव मुख्य कार्यक्रम संस्मरणीय व्हावा यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे , विविध समित्या स्थापन करणे आणि निधी संकलनासाठी काढण्यात येणार्‍या लॉटरी तिकिट विक्रीचा शुभारंभ करणे यासाठी मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ओझर विद्या मंदिर कांदळगाव येथे माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती चिटणीस जी. एस. परब यांनी केले आहे.
हिरक महोत्सवा निमित्त वर्षभर विविध शालेय उपक्रम राबविले जात आहेत. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध प्रकारचे अभ्यासवर्ग या निमित्ताने शाळेत सुरू करण्यात आले आहेत. शाळेच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधानी युक्त असे शिक्षण देण्यासाठी व चांगल्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या विधायक मार्गानी भरीव निधी संकलन करण्यात येत आहे. माजी विद्यार्थी या नात्याने आपला या शैक्षणिक कार्यात सहभाग अपेक्षित आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि आपल्या शाळेचा हिरक महोत्सव अशा अलौकिक योगाच्या पार्श्वभूमीवर २४ एप्रिल २०२२ रोजी होणारा मुख्य कार्यक्रम संस्मरणीय व्हावा यासाठी आपले योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे , विविध समित्या स्थापन करणे आणि निधी संकलनासाठी काढण्यात येणार्‍या लॉटरी तिकिट विक्रीचा शुभारंभ करणे यासाठी मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ओझर विद्या मंदिर ,कांदळगाव येथे आपण सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. याचवेळी शाळेचा या वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उपस्थितीचे आवाहन चिटणीस जी एस परब यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स